‘भाजप-शिवसेने’तील तिढा सुटणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवेसेनेतील तिढा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या भाजपच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडे चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मागे घेण्यासाठी ड्राफ्ट तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. साडे चार वाजता मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘आम्हाला ड्राफ्ट नको तर मुख्यमंत्री पदाचं पत्र हवं आहे’ असं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन 15 दिवस होत आले आहेत तरीही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. जनतेनं भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं आहे. दरम्यान सत्ता स्थापनेत शिवसेनेला समान वाटा पाहिजे आहे. जे ठरलं आहे तसं करा असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं आहे. भाजप मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून असल्याने सत्ता स्थापनेत तिढा निर्माण झाला होता. परंतु लवकरच हा तिढा सुटणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत हे देखील सिल्व्हर ओकला शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. काही वेळापूर्वीच रामदास आठवलेंनी पवारांची भेट घेतली होती.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके