शिवसेनेकडे कुठल्या जागा असाव्यात याची यादी करायला मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलंय : उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे जागावाटप कधी संपते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर जागावाटप करून प्रचाराला सुरुवात करण्याकडे सत्ताधारी पक्षाचे देखील लक्ष आहे.

त्याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक खुलासा केला आहे. त्यामुळे आता युतीत जागावाटप नक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. याआधी शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची माहिती समोर येत होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खुलाश्यामुळे त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसून येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले कि, यावेळी वेगळी पद्धत अवलंबली असून शिवसेनेला कोणत्या जागा मिळाव्यात याची यादी मी मुख्यमंत्र्यांनाच बनवायला सांगितल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ते स्वतःच हि यादी बनवणार असून ती आमच्याकडे देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या खुलाशामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने शिवसेनेसमोर 174 आणि 114 जागांची ऑफर ठेवली होती. त्यानंतर मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा आपापल्या कोट्यातून द्यायच्या असेदेखील सांगितले होते. मात्र शिवसेनेने त्यावर नकार दर्शवला होता. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर जागावाटप कशाप्रकारे होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.