BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)

मुंबई (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -BJP-Shivsena Alliance | भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena leader and MP Sanjay Raut) यांची गुप्त भेट घेतल्याची माहीती समोर आली. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीबद्दलच्या (BJP-Shivsena Alliance) चर्चांना उधाण आलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी लेटरबॉम्ब, महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) मंत्र्यांवर होत असलेले गंभीर आरोप या पार्श्वभूमीवर शेलार-राऊत यांच्या भेटीचं वृत्त आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचक विधान केलं आहे.

 

 

 

 

शत्रुत्व नाही, पण वैचारिक मतभेद

आशिष शेलार (Ashish Shelar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, शिवसेना (Shivsena) आणि आमच्यात शत्रुत्व नाही. पण वैचारिक (Ideological) मतभेद आहेत. या दोन नेत्यांच्या भेटीबद्दल मला काही कल्पना नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

शिवसेनेनं आमचा हात सोडला आणि…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आमच्यामध्ये शत्रुत्व नाही, परंतु वैचारिक मतभेत नक्कीच आहेत.
शिवसेनेने निवडणूक (election) आमच्यासोबत लढवली. मात्र, निवडणुकीनंतर आमचा हात
सोडला आणि ज्यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली, त्यांचाच हात धरला. शिवसेना आणि
आमच्यात वैयक्तिक स्वरुपाचा वाद नाही, आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, असंही ते म्हणाले.

परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात

शिवसेनेनं पुन्हा हात दिला, तर त्यांना सोबत घेणार का, या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राजकारणामध्ये जर-तर असं काही नसतं. राजकारणात जे जर-तर वर राहतात, ते केवळ स्वप्नच पाहतात, राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात (In politics, decisions have to be made based on the situation), असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : BJP-Shivsena Alliance | we are not enemy ideological difference devendra fadnavis bjp shiv sena alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update