BJP-Shivsena | पीकविम्यावरुन उस्मानाबादमध्ये भाजप आणि शिवसेना आमदारांत हिंसक लढाई

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – BJP-Shivsena | शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीकविम्यावरुन उस्मानाबाद जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील तुळजापूरचे (Tuljapur) भाजप (BJP) आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) आणि उस्मानाबादचे शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्यामध्ये पीकविमा (Crop Insurance) वाटपाचे श्रेय घेण्यावरुन वाद सुरु आहेत. या लढाईला आता हिंसक वळण लागले आहे. या वादातून शुक्रवारी एका निमआराम बसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे उस्मानाबादचे राजकीय वातावरण तापले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) असताना, 2020 – 21 वर्षात उस्मानाबादातील 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी बजाज अलाईन्ज जनरल इन्शुरन्स कंपनीकडे (Bajaj Allianz General Insurance Company) 510 कोटी जमा केले होते. मात्र, नुकसान भरपाई करण्याच्या वेळेत कंपनीने सर्वांना पैसे न देता त्यातील फक्त 500 ते 600 शेतकऱ्यांना 85 कोटी रुपये वाटले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल होते, तर राजकारण्यांनी त्यांच्यासाठी धावाधाव सुरु केली. याप्रकरणी आमदार राणा  यांनी प्रशांत लोमटे आणि राजेसाहेब पाटील या समर्थकांमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने सहा आठवड्यात सोयाबिनच्या नुकसानीची संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तसेच कंपनीने पैसे न दिल्यास राज्य शासनाने (State Government) याची भरपाई करण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यामुळे कंपनीची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनावर येऊन पडली आणि या निर्णयात सुधार करावा,
यासाठी राज्य शासानाने न्यायालयात धाव घेतली. तर दुसरीकडे विमा कंपनीने न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च
न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे हा पेच चिघळला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि
शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) गादीवर आले.

आमदार राणा पाटील यांनीच महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली होती,
अशी जिल्ह्यात चर्चा आहे. आता या पीकविम्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी उपोषण
सुरु केले आहे. त्यातूनच शुक्रवारी रात्री एका बसवर दगडफेक करण्यात आली.

Web Title :-  BJP-Shivsena | dispute between kailas patil and rana jagjit singh over crop insurance issue in osmanabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sachin Sawant | राज्यांना कमकुवत करुन संपूर्ण देशाला एका रंगात रंगविणे लोकशाहीला घातक – काँग्रेस

Nitin Gadkari | गडकरींनी भरदिवसा मुंबईकरांना दाखवलं स्वप्न, ‘200 प्रवासी घेऊन डबल डेकर बस उडणार’