अजूनही वेळ गेलेली नाही, शरद पवारांनी जसा स्वतः पळ काढला तसाच…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अजूनही वेळ गेलेली नाही, शरद पवारांनी जसा स्वतः पळ काढला, तसा मुलीला आणि नातवाला तरी का पुढे करताय, उमेदवारी अर्ज मागे घ्या. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने आज शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांयकाळी ५ वाजता कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. जिल्ह्यातील तपोवन मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार तसेच चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेही नेहमी प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे.

कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही लढाई लोकसभेची नाही तर देशाचे संरक्षण करणारी आणि जे देशाचे संरक्षण कधीच करू शकले नाही यांच्याशी आहे. ज्या चार जागांच्या जोरावर शरद पवार देशात राजकारण करतात त्यातली एकही जागा यावेळेस जिंकू देणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, शरद पवारांनी जसा स्वतः पळ काढला, तसा मुलीला आणि नातवाला तरी का पुढे करताय, उमेदवारी अर्ज मागे घ्या. पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा युतीच्या असतील. तर नेहमी नवरा बायकोच्या मागे उभा राहतो पण अशोक चव्हाणांनी तर बायकोला पुढे केले, कारण पुढे खड्डा दिसतोय असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, युतीच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले असून सभेला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते. याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.