पुण्यात होणारी भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन- भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. पर्रिकर यांच्या निधनामुळे सोमवारी पुण्यात भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली असल्याचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

सोमवारी (दि.१८) पुण्यातील बालगंधर्व येथे भाजप व शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांची बैठक होणार होती. मात्र, भाजपचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज सायंकाळी आठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोमवारी होणारी ही बैठक रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजप व शिवसेनेच्या बैठक बोलवली होती.