शिवसेनेनं राष्ट्रवादी, काँग्रेससह सरकार स्थापन केल्यास त्याचा ‘गंभीर’ परिणाम, हिंदुत्ववादी संघटनांचा ‘इशारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय परिस्थितीवर आला राज्यातील काही संघटना आपली भूमिका व्यक्त करायला लागले आहेत. सरकार फक्त हिंदू विचार, हिंदू हिताचे हवे. त्यासाठी भाजप शिवसेनेने एकत्र यावे, भाजपने जुने दिवस विसरु नयेत असा इशारा पुण्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला. शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेससह सरकार स्थापन केल्यास त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला. शिवाय समाजकार्य करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना देखील राजकीय भूमिका घेऊन रस्त्यावर उतरतील अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांकडून मांडण्यात आली.

यावेळी हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटनांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी एकत्र आले होते. या पत्रकार परिषदेला मिलिंद एकबोटे, समीर कुलकर्णी, श्याम महाराज राठोड, अनिल पवार, सुनील घनवट उपस्थित होते. एकबोटे यावेळी म्हणाले की, सरकार वारीला संरक्षण देऊ शकत नाही त्याचे प्रत्यंतर आले आहे. हा देश चैतन्यशील राहिला पाहिजे. ही जबाबदारी राज्यातील राज्यकर्त्यांची आहे. परंतू राजकारणी ही जबाबदारी विसरुन मुख्यमंत्रिपदासाठी भांडत आहेत. जनता यामुळे नाराज आहे. राज्यात भाजप शिवसेना युतीला जनादेश असूनही सरकार स्थापन होत नाही.

यावेळी समीर कुलकर्णी म्हणाले की मतदारांना राजकीय पक्षांना गृहीत धरु नये. कारण असे झाल्यास जनता मतदानातून उत्तर देईल. यापुढे या दोन्ही पक्षांचे एकही आमदार निवडूण येणार नाही यासाठी सर्व संघटना मिळून प्रचार करु.शिवसेना आघाडीसह सरकार स्थापन करुन धोक्यांच्या घंटेला आमंत्रण देत आहे. आम्ही वैचारिक विरोधासाठी पुढे सरसावू.

हिंदुत्ववादी संघटनांकडून मांडण्यात आलेले मुद्दे –
राज्यात नवे जेएनयू होऊ नये आणि येथील विद्यार्थी लाल माकडांच्या नादी लागू नये.
ही महाशिवआघाडी होऊ देणार नाही. ही महाधूर्तआघाडी आहे.
महाआघाडी हे एक संकट आहे, हा आमचा अपमान आहे.
लोकांच्या भावनांशी खेळले जात आहे.

Visit :  Policenama.com