भाजपा सेवा सप्ताह आतून संघटन व्हावे : आ. राम पाटील रातोळीकर

नायगाव : (अविनाश वि.अनेराये) – देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून सेवा सप्ताह राबविला जात आहे या सेवा सप्ताहात संघटन वाढले पाहिजे असे प्रतिपादन आ. राम पाटील रातोळीकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त रातोळी (ता.नायगाव) येथे बैलांना कोणताही संसर्गजन्य आजार होऊ नये या सुरक्षेसाठी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा जि प सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या संकल्पनेतून वरमाई साडी व सत्कार सोहळ्यातील वापरण्यात आलेल्या शाली पासून सुरक्षा कवच (झुल) व शेतकऱ्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी आर्सेनिक औषधांचा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पुढे बोलतांना आ. राम पाटील म्हणाले की समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत परिणामी संपूर्ण जग हे आदराने भारताकडे पाहत आहे. सेवा सप्ताहातून संघटन सुद्धा वाढले पाहिजे .पंतप्रधान मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला त्या अनुषंगाने सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवाव्यात असे आवाहन केले. या सेवा सप्ताह एक आगळा-वेगळा कार्यक्रम लोहगावे यांनी घेऊन मुक्या प्राण्यांची त्यांच्या हातून सेवा घडत आहे.

तसेच यापुढेही त्याने विविध उपक्रम राबवून अशीच सेवा करावी असी अपेक्षा व्यक्त केली. व पंतप्रधान मोदी यांना जनतेच्या सेवेसाठी दीर्घ आयुष्य लाभो व संपूर्ण देश त्यांच्या पाठींशी खंबीर उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात डाँ.साळवे यांनी प्राण्यावरील आजार टाळण्यासाठी घ्यायच्या काळजी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले .तर माणिकराव लोहगावे यांनी घरी कपाटात भरून वर्षानुवर्षे साठवण करून राहणाऱ्या आहेरी साड्या व सत्कारात वापरल्या गेलेल्या शाली यांचा वापर उपयोगात आणून प्राण्यांच्या सुरक्षेसाठी झुली तयार करुन काळजी घ्यावी असे यावेळी शेतकऱ्यांना आवाहन केले.

या कार्यक्रमाला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे, डॉ. विनायक हांडेबाग ,जनार्दन पाटील ,सोपान पाटील ,नंदू पाटील, डॉ.चिद्रे साहेब, गोविंदराव तुपेकर, मारुती भास्करे ,श्रीराम शिरगिरे ,नामदेव वजीरगावे, परमेश्वर पाटील जाधव ,राजू इरेवाड, शिवाजी कोकणे, माधव मेहेत्रे, पिराजी देशमुख ,गजानन पाटील ,विजयचंदर पाटील ,गोविंद पाटील, राहुल माली पाटील गंगाधर पटणे उपसरपंच रातोळी, चिंचे साहेब, निलेश डांगे,पत्रकार सुभाष पेरकेवार ,गोविंदराव नरसीकर ,नामदेव यरकटवार गजानन पाटील आदि उपस्थित होते.