BJP Somuveer Raju | ‘भाजपला मत द्या, 70 रुपयात दारू देऊ’, भर सभेत आंध्रप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमवीर राजू यांचे आश्वासन

हैद्राबाद : वृत्तसंस्था – BJP Somuveer Raju | आंध्र प्रदेशमध्ये सध्या निवडणुक जवळ आलेली नाही. परंतु निवडणुकीसंबंधी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष सोमवीर राजू (BJP Somuveer Raju) यांनी म्हटले की, भाजपाचे सरकार आल्यास लोकांना 75 रुपयात दारू पुरवली जाईल.

भाजपाने मंगळवारी विजयवाडा शहरात जन आग्रह सभा घेतली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि पक्षाचे महासचिव सुनील देवधर हेदखील सहभागी झाले होते.

कार्यक्रमात राजू यांनी म्हटले की, भाजपाला मत द्या, आम्ही तुम्हाला 75 रुपयात दारू देऊ. जर महसूल वाढला तर दारूची किंमत 50 रुपये केली जाईल.

राजू (BJP Somuveer Raju) यांनी आरोप केला की, राज्यात खराब दर्जाची दारू विकली जाते आणि हे सत्ताधारी पक्षाच्या इशार्‍यावर होत आहे.

TMC खासदाराने केली टिका

भाजपा नेत्याच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी घेरण्यास सुरूवात केली आहे. टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी निशाणा साधताना म्हटले की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची खुपच चांगली निवडणूक रणनिती. आता पुढे कबाब बाबत सुद्धा बोलणार का?

 

 

अलिकडेच YSRCP सरकारने सुद्धा लोकांना आकर्षित करण्यासाठी
दारूच्या किमती कमी केल्या होत्या. यामध्ये अतिरिक्त ड्यूटी
कमी केली होती. यामुळे भारतात तयार झालेल्या परदेशी दारूची
(आयएमएफएल) किंमत राज्यात 15-20 टक्केपर्यंत कमी झाली होती.

Web Title :- BJP Somuveer Raju | andhra pradesh somuveer raju vote for bjp will provide liquor for just rs 70

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rashifal 2022 | नवीन वर्षात 4 राशीच्या जातकांचे चमकणार नशीब, तुमच्यावर संपत्तीची देवता कुबेर राहतील प्रसन्न; जाणून घ्या

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान, विदर्भात वीज काेसळून तिघांचा मृत्यू

Pune Crime | ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत’ ! पिंपरी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकाला ‘डायरेक्ट’ पैशांची मागणी

MP Supriya Sule | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोविड पॉझिटिव्ह

Ajit Pawar | मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा?; अजित पवार म्हणाले..

Pune Crime | पुण्यातील तरूणीला अश्लील मेसेज करणं कोल्हापुरातील युवकाला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण