‘राहुल गांधीं नव्हे राहुल लाहोरी’…भाजपच्या प्रवक्ते संबित पात्रा यांचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये परावर्तित होईल, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. पात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधीं(rahul gandhi)चा उल्लेख राहुल लाहोरी असा खोचक केला आहे. याबाबत संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबित पात्रा म्हणाले, “राहुल गांधीं सतत शेजारच्या देशांबद्दल चांगल्या पद्धतीने आणि भारताला अपमानास्पद वाटेल, अशी विधाने करीत असतात. अखेर कॉंग्रेस आणि पाकिस्तान यांचे नाते नेमके आहे तरी काय? असा सवाल वारंवार उपस्थित व्हावा, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे वागणे आणि बोलणे असते, हे भारताचे दुर्दैव आहे. राहुल गांधींना भारताची घृणा आहे. ”

पात्रा म्हणाले की भारताइतकी लोकशाही आणि नागरिक स्वातंत्र्य अधिकार जगात नाही. श्रीमती सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्याकाबद्दल आणि त्यांच्या अवस्थेबद्दल त्या देशाला विचारण्याचे धाडस केले आहे काय?, असा सवाल त्यांनी केला.

पाकिस्तानातील वेब संवादात भारताची प्रतिमा खराब करणारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे नेते असलेले राहुल गांधी हे पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार आहेत का? असा तिखट सवाल भाजपने विचारला आहे.

तबलिगी जमातीचा उल्लेख पाकमध्ये करून भारतातील सरसकट मुसलमानांच्या अवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार थरूर यांना त्यांच्या पक्षाने दिला काय ? ते पाकिस्तानात जाऊन राहुल यांना क्रेडिट देऊ इच्छितात काय? असा सवाल पात्रा यांनी केला आहे.