भाजपच्या अधिवेशनात रंगंलं नाट्य, एकनाथ खडसे दुसर्‍यावरून पहिल्या रांगेत

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – नेरूळमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून त्याच निमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर परत संघटनात्मक बांधणीला सुरुवात करत आहे. चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाटील यांच्याकडे सूत्रं दिली आहेत. सकाळच्या सत्रातील पदाची सूत्रे जे. पी. नड्डा यांनी पाटील यांच्याकडे दिली असून या अधिवेशनात पक्षाकडून काही राजकीय प्रस्तावही मांडले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिननंदनाचा प्रस्ताव संमत केला असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर नाट्य बघायला मिळाले.

दरम्यान जे. पी. नड्डा यांच्यासह देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनय सहस्रबुद्धे, रावसाहेब दानवे, गणेश नाईक, विनोद तावडे, उदयनराजे भोसले, नारायण राणे, पंकजा मुंडे, सरोज पांडे, आशीष शेलार, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, विजया रहाटकर, खासदार कपिल पाटील, संघटन मंत्री व्ही. सतीश, विजय पुराणिक, हंसराज अहिर, चंद्रशेखर बावनकुळे, मंदा म्हात्रे, श्याम जाजू हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दुसऱ्या रांगेत बसलेले असताना काहीतरी कुजबुज सुरु झाली. नंतर काही नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी खडसेंना पहिल्या रांगेत जागा दिल्याने खडसे यांची नाराजी झाली. तसेच तेथे नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारी एक वॉल तयार करण्यात आली असून त्यात मोदींचे वृत्तपत्रातील वेगवेगळे फोटो लावले आहेत.

पक्षाने अधिवेशनाच्या ठिकाणी भाजप सरकार आणि महाविकास आघाडीची तुलना केली. त्यात सरकार कसे अपयशी ठरले याचे बॅनर्स लावत सरकारची महाभकास आघाडी असाही उल्लेख केला आहे.