‘हॅलो, मी आमदार चंद्रकांत पाटील यांचा PA बोलतोय’ प्रकरणी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः दिली पोलिस ठाण्यात फिर्याद, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॅलो, मी “आमदार चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलतोय, पर्वती येथील कार्यलयात 25 लाख रुपये आणून द्या” या अज्ञात क्रमांकावरून येणाऱ्या फोनने शहरात सध्या खळबळ उडाली आहे. अज्ञात भामट्याकडून हे फोन येत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्वतः आमदार व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातुन बोलत आहे, कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर पाटील यांच्याकडुन जनतेसाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. या कामासाठी पैशांची गरज आहे, असे सांगुन संबंधित व्यक्ती कोथरुड व चिंचवड येथील डॉक्टरांकडुन लाखो रुपये मागत होती. त्यादरम्यान काही डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी हा प्रकार चंद्रकांत पाटील यांना सांगितला. या प्रकरणाची दखल घेऊन पाटील यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यापूर्वी निगडी पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधिताचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान पुण्यात देखील या तक्रारी वाढल्या आहेत. फिर्यादीसोबतच दोघांना देखील असे फोन आले आहेत. अधिक तपास कोथरुड पोलिस करत आहेत.