दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण ‘कडक’, पक्षाविरोधात बोलू नका ; चंद्रकात पाटलांचा ‘सूचक’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल गोपीनाथ गडावर मेळावा पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटलांना भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. पक्षशिस्तीचा भंग करु नका. केंद्रापासून (दिल्ली) गल्लीपर्यंत वातावरण कडक आहे. रोज कोणीही उठून पक्षविरोधी बोलले तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही.

कालच्या पंकजा मुंडेंनी घेतलेल्या मेळाव्या चंद्रकात पाटील, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे उपस्थित होते. याशिवाय अनेक आमदार माजी आमदारांबरोबर राज्यभरातील हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे आणि खडसे यांनी राज्यातील नेतृत्वार हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद उघड झाला.

यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी बंडखोरांना इशारा दिला आहे, ते म्हणाले की केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण आहे. पक्षाविरोधातील कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी याची झलक सर्वांनी पाहिलीच आहे.

चंद्रकांत पाटील नाराज –
पंकजा मुंडेंनी मांडलेल्या भूमिकेवर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की परळीच्या मेळाव्यात काहींनी बंडाची भाषा केली. बंड केल्याशिवाय न्याय मिळत नाही. शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बंड केल्यामुळे त्यांना न्याय मिळाला. मात्र, बंड आपल्या लोकांविरुद्ध करायचा नसतो. शिवाजी महाराजांनी मोघलांविरुद्ध बंड केला. सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. मतभेद असायला पाहिजे. परंतु ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. त्यातून मार्ग काढता येईल.

चंद्रकांत पाटील म्हणाले की मी मेळाव्याला जाऊ नये असे अनेकांचे मत होते. तेथे अनुचित प्रकार होऊ शकते असे सांगण्यात आले होते. पण मी ठाम होती. जे झाले ते चित्र वेदना देणारं होतं, हे मात्र खरं. परंतू मी गेलो नसतो तर एकूण प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली असती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/