भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप BJP सत्ताधारी ‘पुणे महापालिकेनेच’ खोटा ठरविला !

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संसर्गामध्ये प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोथरूड मतदार संघातील नागरिकांकरिता आपण दोन रुपये दराने खरेदी केलेली आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधाची डबी राज्य शासनाने २३ रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करणारे भाजपचे प्रदेशअध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेने खोटे ठरविले आहे. वस्तुस्त: आयुष मंत्रालयाने आर्सेनिक अल्बम गोळया सुचविल्यानंतर पुणे महापालिकेने मे महिन्यांत २० रुपयांना डबी घेतली आहे. तर नगरेसवकांच्या मागणीवरून पुन्हा खरेदीसाठी निविदा मागविल्यानंतर डबीचा सर्वात कमी दर हा ७ रुपये ९० पैसे इतका आला आहे. त्यामुळे राज्य शासनावर आरोप करणार्‍या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांतील हवा निघून गेल्याचे समोर आहे.

भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी गुगल मीट द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाची साथ रोखण्यात अपयशी ठरल्यावरून राज्य शासनावर हल्लाबोल केला. आपण कोथरूड मतदारसंघातील नागरिकांना वाटप करण्यासाठी २ रुपये दराने घेतलेली अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधांची डबी शासनाने २३ रुपयांना खरेदी केल्याचेही सांगितले. एवढेच नव्हे कोरोनाच्या लढ्यात लागणार्‍या अत्यावश्यक साहित्याची खरेदी करताना जवळच्या व्यक्तिंवर कृपादृष्टी केली जात असून राज्य शासन कोरोनाच्या संकटातही भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलेल्या आर्सेनिक अल्बम या गोळ्यांची पुणे महापालिकेनेही खरेदी केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने ६ मार्चला झालेल्या बैठकीमध्ये कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहाण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्या नागरिकांना देण्याची सूचना केल्यानंतर देशभरातील बहुतांश राज्य सरकार आणि स्थानीक स्वराज्य संस्थांनीही या गोळ्यांची खरेदी केली आहे. पुणे महापालिकेने मे महिन्यांत कोरोना कंटेन्मेंट झोेनमधील नागरिकांसाठी कामधेनू या संस्थेकडून २० रुपये दराने १४ लाख रुपयांच्या ७० हजार आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या बॉटल्स खरेदी केल्या आहेत. या गोळ्या कोटेशन मागवून खरेदी करण्यात आल्या होत्या.

यानंतर नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील नागरिकांकडून गोळ्यांची मागणी होउ लागल्यानंतर प्रशासनाने पुरवठादारांकडून २० लाख बॉटल्स खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. नुकतेच या निविदा उघडल्या आहेत. आर्सेनिक अल्बम पुरवठ्यासाठी आलेल्या ७ निविदांपैकी दोन निविदा पात्र ठरल्या आहेत. यापैकी सर्वात कमी दर असलेली निविदा ही ७ रुपये ९० पैसे प्रति बॉटल इतकी आहे. यामुळे अवघ्या दोन रुपयांत आर्सेनिक अल्बम गोळ्यांची खरेदी केल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा, त्यांचीच सत्ता असलेल्या महापालिकेने खोटा ठरविल्याचे समोर येत आहे.

मे मध्ये पुरवठा करणार्‍या ‘कामधेनू’ संस्थेने निविदेत सहभाग का घेतला नाही?

तातडीची निकड म्हणून पुणे महापालिकेने मे महिन्यांत निविदा मागविण्याऐवजी कोटेशन मागवून कामधेनू या संस्थेकडून २० रुपये दराने ७० हजार आर्सेनिक अल्बमच्या बॉटल्स खरेदी केल्या ही वस्तुस्थिती आहे. परंतू याच कामधेनू संस्थेने महापालिकेने निविदा काढल्यानंतर मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी झालेली नाही, यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

मागणी व पुरवठ्यामुळे दरांमध्ये तफावत – प्रशासकिय अधिकार्‍यांचे मत

कोरोनाची साथ देशात आली त्यावेळी देशात पीपीई किटस्, एन ९५ मास्क, सॅनिटायजरची कमतरता होती. तसेच प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या औषधांचेही तत्कालीन मागणीनुसार उत्पादन होत होते. कोरोनाची साथ आल्यानंतर या सर्वच गोष्टींची मागणी वाढल्याने अगदी खुल्या बाजारातही या सर्वच वस्तुंचे दर प्रचंड वाढले होते. एवढेच नव्हे तर या वस्तुंचा काळाबाजार आणि दवाखान्यांकडून दिल्या जाणार्‍या बिलांमध्येही या वस्तुंचे दर पाहून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे डोळे विस्ङ्गारत होते. मात्र, लॉकडाउनच्या काळात या अत्यावश्यक वस्तुंचे उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्या आणि संस्था पुढे आल्या आहेत. त्यानंतर मात्र, सर्वच वस्तुंचे दर कमी होत गेले. कोरोना बाधितांवर उपचारासाठी तातडीची गरज म्हणून आहे त्या दरात किंबहुना काहीशी घासाघिस करून दर कमी करून या वस्तु उपलब्ध करून घेणे, हा एकमेव पर्याय सर्वच प्रशासनांसमोर होता. त्यामुळे मागील चार महिन्यांतील उपचारांची निकड आणि वस्तुंचे दर याची तुलना होउ शकत नाही, असे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

२ रुपयांत ‘बाटली’ कि कोथरूडकरांची फसवणूक ?

भाजपचे प्रदेशअध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा ते विरोधी पक्षात असल्यावर आणि आपलीही महापालिकांमध्ये सत्ता असल्यावर विश्‍वास नाही. त्यामुळेच कोरोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये बिनबुडाचे आरोप करुन केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहायचा प्रयत्न करत आहेत. कोथरूडकरांना त्यांनी नेमके दोन रुपयांत आणलेल्या डबीमधून कोणते औषध दिले? हे त्यांनाच माहीती. ते केवळ सरकारवर आरोप करून कोथरूडकरांची करत असलेल्या ङ्गसवणुकीपासून लक्ष विचलित करत आहेत. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असली तरी कोरोना संदर्भातील सर्वच निर्णयांमध्ये सर्वच राजकिय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाला साथ दिली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्यात पुण्यात राजकारण करून पुण्याचे वातावरण आणखी दूषित करू नये. उलट पुणे महापालिकेने कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केलेल्या सर्व खरेदीची पारदर्शक माहिती पुणेकरांसमोर ठेवावी, अशी आमची मागणी आहे.

विशाल तांबे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like