बाबा रामदेव यांच्या भूमिकेला भाजप आमदाराचा पाठिंबा, म्हणाले – ‘ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर्स राक्षसांसारखे काम करताहेत’

बलिया : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून ॲलोपॅथी आणि आयुर्वेद उपचार पद्धतीवरून देशात वादविवाद सुरु आहे. ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे, असे वादग्रस्त विधान योगगुरु बाबा रामदेव Baba Ramdev यांनी केले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील बलिया येथील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी बाबा रामदेव Baba Ramdev यांच्या भूमिकेला पाठिंबा देत ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर्स राक्षसांसारखे काम करत असल्याचा आरोप केला आहे. बाबा रामदेव यांची आयुर्वेदिक उपचार पद्धती आपल्याकडील सनातन परंपरा आहे. आयुर्वेदाचा स्वीकार करून स्वस्थ भारत-समर्थ भारत यासाठी मोठे काम केले जाऊ शकते. मी सन्यास स्वीकारणार नाही. मात्र, राजकीय सन्यासानंतर याच अभियानात सहभागी होणार आहे. यासाठीच बाबा रामदेव यांना माझे समर्थन असून, ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टरांचा निषेध करतो, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

अलीकडेच बाबा रामदेव Baba Ramdev यांनी ॲलोपॅथीला स्टुपिड सायन्स म्हणून हिणवले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आएमएने बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा नोंद करत अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. मात्र, यानंतर आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, बाबा रामदेव यांना पाठिंबा दर्शवला आहे. आमदार सिंह यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, महागड्या उपचार पद्धतीचे समर्थन करत समाजाला लुबाडणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत. 10 रुपयांचे औषध 100 रुपयांना विकणारी लोक पांढ-या वेशातील गुन्हेगार असून अशी माणसे समाजाचे हितकारक कधीच असू शकत नाहीत. ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉटर्स राक्षसांसारखे काम करत आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीलाही आयसीयूमध्ये ठेवून पैसे कमवण्याचे काम डॉक्टर्स करतात. यापूर्वीच्या युगातील राक्षस एखाद्याला मारून सोडून देत होते. मात्र, आजच्या युगातील डॉक्टर्स मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे लुटण्याचे काम करत असल्याा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय