खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाईन – घरच्यांनी विरोध केला असतानाही त्याला न जुमानता मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह Intercast love marriage केल्याने संतप्त झालेल्या भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी 9 जणांना सोबत घेऊन जावयाच्या घरी जाऊन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून 6 जणांना अटक केली आहे. नेवासे येथे (ता. श्रीरामपूर) येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोटार, एक पिस्तूल, एअरगन, चाकू, गुप्ती आदी हत्यारे जप्त केली आहेत.

याप्रकरणी प्रेमविवाह Intercast love marriage केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक खेडकर, हृषीकेश खेडकर, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अटक आरोपीना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

नेवासे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांतच आणि ऋतुजा माणिक खेडकर यांचे एकमेकांवर प्रेम जुळले होते. मात्र घरच्यांनी आंतरजातीय विवाहाला Intercast love marriage विरोध केला होता. त्याला न जुमानता ऋतुजा व बंटी या दोघांनी 1 मार्च रोजी लग्न केले होते. विवाहाला विरोध असल्याने वडील खेडकर यांनी जावई बंटीला धमकी दिली होती. नेवाशा येथील बंटी याच्या घरी चार वाहनातून खेडकर याने लोक घेऊन आले. वाघ कुटुंबीयांना त्यांनी मुलगी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. दरम्यान एकाने बंटीवर गुप्तीने हल्ला केला. पण त्याने वार चुकविला. बंटीने आरडाओरडा केल्याने एकाने त्याच्यावर पिस्तूल रोखले. हा गोंधळ सुरू असताना लोक जमा झाले. काहींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जमाव जमल्यानंतर आरोपी पळून गेले. मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्वत: दुचाकीवर आरोपीचा पाठलाग केला. शेवगाव रस्त्यावर भानसहिवरा शिवारात तीन मोटारीसह सात जणांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक विजय करे तपास करत आहेत.

यूजर्सना होणार फायदा ! BSNL चा नवा Data Add-ons प्लान जाहीर, जाणून घ्या

NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले – ‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या’

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

‘…म्हणून राज ठाकरे मास्क वापरत नसतील’ – रामदास आठवले