पुन्हा एकदा भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘शाहीन बाग नव्हे शैतान बाग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली. जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल तसतसे राजकीय वातावरण तापत आहे. प्रत्येक पक्षाकडून आपल्या स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. प्रचारादरम्यान नेत्यांमध्य शाब्दीक चकमक सुरु आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत भाजपचे अनेक नेते वादग्रस्त विधान करत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सचिव तरुन चुघ यांनी शाहीन बागची तुलना दहशतवादी इस्लामिक स्टेटसोबत केली आहे. शाहीन बाग म्हणजे शैतान बाग असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी ट्विटरवर केले आहे. यापूर्वी भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी गोळी मारण्याचे समर्थनही त्यांनी केले. आम्ही दिल्लीला सीरिया बनवू देणार नाही. त्यांना आयएसआयएसच्या धोरणानुसार काम करू देणार नाही असे तरुन चुघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. चुघ यांनी पुढे म्हटले की, ते मुख्य रस्त्यांना ब्लॉक करून दिल्लीतील लोकांच्या मनात भीती पसरवण्याचे काम करीत आहेत. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. आम्ही दिल्लीला जळू देणार नाही.

नवीन चुघ यांनी आणखी एक ट्विट करत अनुराग ठाकूर यांचे समर्थन केले. देशद्रोह्यांना चुकीचे काम करू देणार नाही. भारताच्या अखंडतेला कोणालाही तोडू देणार नाही. शाहीन बागचा अर्थ हा शैतान बाग असा होता. भारतात हाफिज सईदच्या विचारांना या ठिकाणी थारा लागू देणार नाही, असे त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.