भाजप सध्या ‘या’ भूमिकेत : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. मात्र, भाजपने सत्तास्थापनेस असमर्थ असल्याचे सांगितल्याने राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. भाजपसोबत शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केला. काँग्रेसच्या पाठिंब्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेकडे काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्रक आलेलंच नाही. काँग्रेसकडून जे पत्रक आलंय त्यामध्ये पाठिंब्याचा उल्लेखच नाही.

दरम्यान, आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वर्षा बंगल्यावर झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका घेण्याचे ठरले आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर लक्ष देण्याचे आजच्या बैठकीत ठरल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवसेनेच्या भूमिकेबाबात त्यांना विचारले असता, त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलणे टाळले.

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्तासंघर्ष सुरु झाला. भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने आणि शिवसेना मुख्यमंत्री पदावर आडून बसल्याने दोन्ही पक्षात असलेली युती संपुष्टात आली. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठींब्यावर सस्तास्थापनेचा दावा केला. आज दिवसभर अनेक घडामोडीनंतर शिवसेनेने सायंकाळी सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, काँग्रेसने पाठिंब्याबाबतचे पत्र न दिल्याने शिवसेनेचे सत्तास्थापनचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like