भाजप खासदारवर ‘प्राणघातक’ हल्‍ला, पोलिसांच्या ‘लाठीचार्ज’मध्ये डोकं फुटलं !

बराकपूर (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था – भाजपचे बराकपूरचे खासदार अर्जुन सिंग यांच्यावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खासदार अर्जुन सिंग यांनी सांगितले की, माझ्यावर हल्ला करून माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली. सर्वजण शांततेत आंदोलन करत होते. पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी लाठीचार्ज करत माझ्या डोक्यावर प्रहार केला. तसेच मला शिवीगाळ केली. दरम्यान माझ्या घरावरही हल्ला करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसर, अर्जुन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्य़ालय ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. दरम्यान, टीएमसी कार्य़कर्त्यांनी सिंग यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीची तोडफोड केली. याच्या विरोधात सिंग यांच्या कार्यकर्त्यांनी बराकपूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. आदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये पोलिसांची एक काठी सिंग यांच्या डोक्यावर बसल्याने ते जखमी झाले.

सिंग यांनी पोलिसांवर केले आरोप
पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी शिवीगाळ करत डोक्यावर काठी मारल्याचा आरोप अर्जुन सिंग यांनी केला आहे. तसेच यापूर्वी देखील माझ्या घरावर हल्ला झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निषाणा साधत त्यांना धमकीवजा इशारा दिला आहे. अशा प्रकराचे हल्ले थांबले नाहीत तर टीएमसी नेत्यांना देखील अशाच प्रकारे वागणूक दिली जाईल, असे ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –