‘कोरोना’च्या संकटात भाजपा काढणार 750 व्हर्च्युअल रॅली, सत्तेतील दुसर्‍या पर्वातील पहिल्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – सध्या देशभर लॉकडाऊन असल्याने जमावबंदी आहे. राजकीय, सामाजिक जाहीर कार्यक्रम सर्वांना बंदी आहे. संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढत आहे. अशावेळी भाजपा देशभरात ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वाला ३० मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने भाजपाने विविध कार्यक्रमाची तयारी केली आहे. त्यासाठी भाजपा १ हजार व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे.

भाजपाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प, जागतिक कल्याणासाठी भारताची भूमिका आणि कोरोना प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयींचा निर्धार करण्याच्या आवाहनाला देशातील १० कोटी कुटुंबांपर्यत पोहचविले जाईल.
मोदी सरकार २ च्या वर्षपूर्ती निमित्त भाजपा सोशल डिस्टन्सिंग आणि एमएचएच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन १ हजार व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स तसेच ७५० व्हर्च्युअल रॅली काढणार आहे.