भाजपने खडसेंबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, नाथाभाऊंनी स्वतः सांगितलं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसे यांचा तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या कार्य़कर्त्यांनी अपक्ष लढण्यासाठी आग्रह धरला आहे. कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये खडसे यांनी पक्षाने मला तिकीट देणार नसल्याचे सांगितले असून तुमच्या ऐवजी कोणाला उमेदवारी देयची अशी विचारणा केल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पक्षाने मला उमेदवारी न देता तुम्ही सांगाल त्याला उमेदवारी देण्यात येईल असे सांगितले असल्याचे खडसेंनी सांगितले. मात्र, मला का उमेदवारी नाही याबाबत पक्षाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खडेसे यांनी केली आहे. दरम्यान खडसेंवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत समर्थकांनी खडसे यांनी योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. मी दुसरा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना खडसे म्हणाले मी 3 महिने नाही तर 3 वर्षात कधी शरद पवारांच्या संपर्का नव्हतो. शरद पवारांनी एकनाथ खडसे हे 3 महिन्यांपासून आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.

isit : Policenama.com