भाजपा प्रदेश अध्यक्षांकडून युतीचा मोठा खुलासा 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र तयार असणे आणि नसणे, यामध्ये फार काही विशेष नाही.  ‘युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, केवळ बसायचे आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे. असा भाजपा – सेना युती बाबतचा मोठा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याआधी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी युती बाबतचे वक्तव्य केले होते.

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात म्हाडाच्या मुक्तछंद महोत्सवाचं उद्घाटन झाले होते. दरम्यान  “दहीहंडीच्या खेळात एक टीम असते. एकमेकांवर विश्वास असतो. आम्ही कोणत्या थरावर राहणार आहोत. हे तुमच्यावर उद्या दिल्लीत ठरणार आहे. आमचे काही वाद किंवा मतभेद झाले असतील. त्याबद्दल मी काही स्पष्टीकरण देणार नाही.” असे वक्तव्य युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले होते.

दरम्यान केंद्र तयार असणे आणि नसणे, यामध्ये फार काही विशेष नाही.  ‘युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, केवळ बसायचे आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे.  असे जालन्यात पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर युतीसाठी आम्ही शेवटपर्यंत आमच्याकडून प्रयत्न करणार फक्त निर्णय शिवसेनेला घ्यायचा’ आहे असेही ते म्हंटले.

विशेष म्हणेज, भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या लातूर येथील मेळाव्यात युतीबद्दल केलेल्या विधानानंतर भाजप आणि शिवसेनेत कमालीचे संबंध ताणले गेले आहे.इतकेच नव्हे तर ‘युतीचा विषय खड्यात गेला’असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणले होते. मात्र दुसरीकडे भाजप नेते युतीवर ठाम आहे असे दिसून येते. याचबरोबर ‘रावसाहेब दानवे यांना आता रडवण्याची वेळ आली आहे. अशी टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या तऱ्हेची वैयक्तिक टीका करतात त्यावरून त्यांची पातळी समजते.तसेच ‘घोडा मैदान सामने है’, सगळ्यांना चारही मुंड्या चित करणार, हे मी प्रत्येक निवणुकीत केले आहे आणि यावेळेलाही करेल, असे भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हंटले होते. यावरून युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.