…तो कस्तुरचंद पार्क सुद्धा आज लाजला असेल ; राहुल गांधींच्या सभेतील कमी गर्दीवरून भाजपची टिका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या कस्तुरचंद पार्कवर स्व. अटलजी आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी गतकाळात आणि अलीकडे नरेंद्र मोदी यांनी गर्दीचे सर्व विक्रम मोडले, तो कस्तुरचंद पार्क सुद्धा २०% पेक्षा कमी भरलेला पाहून आज लाजला असेल !, अशी टीका भाजपने राहुल यांच्या सभेतील गर्दिवरून केली आहे. भाजपने त्यासंदर्भात एक ट्विट आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केली आहे.

राहुल गांधी यांनी नागपूरात कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा प्रचार करण्यासाठी आज कस्तूरचंद पार्क या मैदानावर सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजप सरकारसह मोदींच्या आश्वासनांवर जोरदार हल्लाबोल चढवला. मात्र, त्यांच्या याच सभेला मात्र पुरेशी गर्दी झाली नाही. तसेच मैदानाची मागिल बाजू रिकामी दिसत होती. यावरूनच भाजपने त्या सभेचे फोटो शअर करत त्या सभेची खिल्ली उडवली आहे.

मैदान तर २०% पेक्षा कमीच भरले होते आणि जो काय २०% भाग व्यापला त्यातही अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. महाराष्ट्र आणि विदर्भातील जनतेने राहुल गांधी यांना नागपुरात बोलावून हा कौल दिला, असेही भाजपने म्हटले आहे.

Loading...
You might also like