भाजपाचा रगडापेटीस, ढोकला छाप विजय : उद्धव ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची हे भाजपाचे धोरण आहे. चंद्रपूरच्या पत्रकार संघापासून मुंबईच्या प्रेस क्लब निवडणुकीतही भाजपा त्यांचे पॅनल उतरवत आहेत. मुंबई डिस्ट्रीक्ट हाऊसिंग फेडरेशनचा विजय मोठा वाटणाऱ्यांना उद्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाने एकतफी निवडणूक जिंकल्याचा दावा माध्यमांत केला असला तरी तो रगडापेटीस, ढोकला छाप विजय आहे, असा टोला शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4c58da5-c6c8-11e8-8a0b-058c1420c0f5′]

मुंबई डिस्ट्रीक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. यामध्ये भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, शिवसेनेचा दारूण पराभव कसा झाला हे ढोल बडवून सांगणाऱ्यांची अक्कल गहाण पडली आहे. कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची, हे भाजपाचे धोरण आहे. असा विजय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएमच्या मदतीने मिळाला तरी त्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वास दिले जाते, हा मोठाच विनोद आहे.

एमआयएम, भारिपच्या सभेने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही धास्तावले

या संस्थेतही भाजपाची भ्रष्ट घुसखोरी झाल्यामुळेच शिवसेना रिंगणात उतरली. सेना रिंगणात उतरताच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम असे एक सर्वपक्षीय पॅनल उभा केले गेले. शिवसेना स्वतंत्र लढूनही १२५० मते तर भाजपाच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीयांना १४५० मते मिळाली. मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, त्यांचे राजकीय अर्थमंत्री हे जणू हाऊसिंग सोसायट्यांची मते विकत घेण्यासाठीच या निवडणुकीत उतरले. शिवसेनेला विजयी होऊ द्यायचे नाही यासाठी भाजपाने पाच कुबडय़ा वापरल्या. त्यामुळे नैतिक विजय हा शिवसेनेचाच झाला आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef9e55af-c6c8-11e8-9ef6-3f680a9e608c’]