विनोद तावडेंकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले – ‘उध्दव ठाकरे आणि शरद पवारांकडून अपेक्षा’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तसेच अशा प्रकरणात पक्षनेतृत्व संवेदनशील असावे लागते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून राजीनाम्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

तावडे म्हणाले की, पुजा चव्हाण या एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेला आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा हवा आहे. लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भाजप आग्रह धरत आहे. अधिवेशनच्या अगोदर राजीनामा घेण्याची कृती संवेदनशील नेतृत्व नक्की करेल अशी आशा असल्याचे तावडे म्हणाले. दरम्यान समाजातल्या सगळ्या व्यवस्था सुरु केल्या आणि विधिमंडळ जे अतिशय सुरक्षित असते. त्याठिकाणी कोरोनाची चाचणी करूनच प्रवेश दिले जात आहे. असे असताना विधिमंडळ अधिवेशन चालू केल्यामुळे कोरोना वाढेल आणि बार चालू केल्यामुळे कोरोना वाढत नाही हे सामान्य माणसाला न पटणारी गोष्ट असल्याचे तावडे म्हणाले.