काय सांगता ! होय, औरंगाबादमध्ये भाजप Vs BJP, खासदार पुत्रांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचे थैमान वाढत असताना भाजप खासदाराच्या मुलाने एका भाजप कार्यकर्त्याला घरात घुसून बेदम  मारहाण केली आहे. आली त्यामुळे औरंगाबादमध्ये भाजप विरुद्ध भाजप असे चित्रा तयार झाले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=567006280903795&id=100027832837253

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना आतापासूनच भाजपमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावर अनेक राडे होत आहेत.भाजपचे खासदार डॉ.भागवत कराड यांच्या मुलांनी शनिवारी रात्री भाजपच्याच एका कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण केली. तसेच त्याने घरातल्या महिलांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पक्षातंर्गत असल्याने दोन्ही बाजुंनी समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.