BJP Vs Congress | गोव्यात भाजप मंत्र्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; काँग्रेसचा गंभीर आरोप

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन टीम – BJP Vs Congress | सरकारमधील एका मंत्र्याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे या प्रकरणात मंत्र्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. येत्या १५ दिवसात या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून न टाकल्यास नावासह मंत्र्याला उघडे पाडण्याचा तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (GPCC) गिरीश चोडणकर (Goa Pradesh Congress committee president Girish Chodankar) यांनी दिला आहे. (BJP Vs Congress)

 

गिरीश चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले की, पीडितेला नोकरी आणि घर देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी या मंत्र्यांने लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही त्यातून ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर धमकी देऊन तिला गर्भपात करायला लावला. पीडित महिलेबरोबर या मंत्र्याचे असलेले संभाषणाचे ऑडिओ क्लिप्स, व्हॉट्सअँप चॅट, तसेच व्हिडिओ क्लिप्स मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवले असूनही त्यांनी कारवाई केली नाही. दिलेले पुरावे नष्ट केले असा आरोप करत एका बेकायदा व्यवसायात संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही भागीदार आहेत त्यामुळेच मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

हवेत बाण मारू नका : भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे

यासंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (goa bjp president sadanand tanavade) म्हणाले, मंत्र्याचे नाव न घेता हवेत बाण मारला आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या तोंडी अशी बेजबाबदार विधाने शोभत नाही. वैयक्तिक आरोप करताना त्यांनी मंत्र्याचे नाव घ्यावे. महत्त्वाचे म्हणजे पीडितेने अद्याप तक्रार दिली नाही. त्यामुळे आरोपाबाबत संशय घेण्यास वाव असल्याचे त्यांनी म्हंटले. (BJP Vs Congress)

 

Web Title : BJP Vs Congress | goa harassment woman bjp minister serious allegations warning congress take streets

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा