BJP Vs Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारीच घेतली आहे का? – भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची बोंब उठविल्यानंतर महाराष्ट्रातील 44 गावे कर्नाटकला जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या महाविकास आघाडी (BJP Vs Maha Vikas Aghadi) देत आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या युतीने म्हणजे महाविकास आघाडीने (BJP Vs Maha Vikas Aghadi) महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारीच घेतली आहे का, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

 

भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या नाकर्तेपणामुळे त्यावेळी बेळगाव महाराष्ट्रात येऊ शकले नाही, असे उपाध्ये म्हणाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते एस. एम. जोशी यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे की, तत्कालीन राज्य आणि केंद्रातील नेतृत्वांच्या नाकर्तेपणामुळेच बेळगाव महाराष्ट्रात आले नाही. त्यांच्या राजकारणामुळे सीमा प्रश्न सुटला नाही. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. मग तरी देखील महाविकास आघाडी सातत्याने अपप्रचार करत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळविल्याचा खोटा प्रचार यांनी केला होता. आता कर्नाटक महाराष्ट्रातील गावे पळविणार, असा खोटा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याला बदनाम करायचे ठरवलेच आहे का, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

 

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारीच घेतली आहे.
या विषयावर राजकारण करुन महाविकास आघाडीने त्यांच्या राजकारणातील संकुचितपणा दाखवून दिला आहे,
असे केशव उपाध्ये म्हणाले.

 

Web Title :- BJP Vs Maha Vikas Aghadi | bjp spokesperson keshav upadhye slams mahavikas aghadi over karnataka cm bommai remarks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते – देवेंद्र फडणवीस

Prakash Ambedkar | राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’