BJP Vs NCP | संघर्ष पेटला ! सोलापूरात राष्ट्रावादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक, गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – BJP Vs NCP | सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड (NCP Office Vandalise) करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या (Solapur District Office) काचेवर दगड मारुन तोडफोड (Vandalism by throwing stones at glass) करण्याचा प्रयत्न दोन व्यक्तींनी केला आहे. सोलापूर शहरातील रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला (Ramlal Chauk Solapur) करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात (Solapur) दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर फडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) विरोधात घोषणाबाजी केली होती. गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) कार्यकर्ता असल्याचा आरोपही (Allegation) करण्यात आला होता. त्यानंतर आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील (Solapur city) राष्ट्रवादी कार्यालयावर (NCP office) दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिस (Solapur City Police) दलातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला

बहुजन संवाद कार्यक्रमांतर्गत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सोलापूर शहरात (Solapur City) सध्या घोंगडी बैठका घेत आहेत. काल ते शहरातील मड्डी वस्ती परिसरात एसबीआय कॉलनी (SBI Colony) येथे बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर एक दगड भिरकावण्यात आला. त्यात गाडीची समोरची काच फुटली. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकांनीच केला असून प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला आहे, असे पडळकर या घटनेनंतर म्हणाले होते.

 

भाजपनं ठरवून केलेला स्टंट

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपनं ठरवून केलेला स्टंट (BJP’s stunt) आहे.
प्रसिद्धीसाठी हे सगळं केलं गेलं आहे. पडळकरांची आजची प्रतिक्रिया मी पाहिली.
दिलीत, उपेक्षित, शोषित, वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असं ते म्हणत आहेत.
पण वंचित आणि शोषितांचे प्रतिनिधी असं लँड रोव्हर (Land Rover) किंवा 40-50 लाखांच्या गाड्या घेऊन फिरत नसतात,
असा टोला आमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी लगावला आहे.

Web Titel :- BJP Vs NCP | ncp office vandalised in solapur after attack on mlc gopichand padalkar car

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल