BJP vs Sena | ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर भाजप-शिवसेना (BJP vs Sena) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात (BJP vs Sena) रस्त्यावर उतरुन आंदोलन केली. आत भाजपने सामानाचे संपादक रश्मी ठाकरे (rashmi thackeray saamana editor) यांच्या विरोधात नाशिकमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करुन नाशिकमध्ये पोस्टर झळकवले आहे. त्यामुळे हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात (nashik sarkarwada police station) भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जावर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनच्या आजच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.

Trojan Triada Virus | अलर्ट! गुगल प्ले स्टोअरवर बनावट WhatsApp, चुकूनही करू नका डाऊनलोड; अन्यथा…

याशिवाय नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोस्टर झळकवले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, राणेंविरोधात नाशिक पोलीसांतच तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडूनही नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. आता नाशिक पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा
नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत
कुणी असं विधान केलं असत तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असेत.
नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे. एका मर्यादेपलिकडे ही
बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही. हे कृतीनं दाखवून देण्याची हीच वेळ आहे.

हे देखील वाचा

Gold-Silver Price Today | सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Corona In India | भितीदायक ! गेल्या 24 तासात देशात कोरोनाची 46,164 नवी प्रकरणे; 607 जणांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  bjp vs sena complaint lodged against saamana editor rashmi thackeray at nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update