BJP Vs Shivsena | शिवसेनेला झटका? ‘सेनेचे 14 खासदार संपर्कात तर 25 आमदार नाराज’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Vs Shivsena | राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र अशातच भाजप (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. प्रसाद लाड यांनी शिवेसेनेचे 14 खासदार संपर्कात आणि 25 आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. (BJP Vs Shivsena)

तळमळतंय जळमळतंय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सभागृहात म्हणाले होते. मात्र त्यांच्याच पक्षातील खासदारांची तळमळ जळमळ त्यांना दूर करता आली नाही. त्यावरचं चूर्ण आमच्याकडे असून लवकरच आम्ही ते देऊ असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

शिवसेना नेत्यांना पालकमंत्री (Guardian Minister) दाद देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे. जे खासदार आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याबद्दल योग्य वेळ की सांगू मात्र ती योग्य वेळ कधी येणार हे आम्ही सांगणार नसल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं. यावेळी बोलताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पाडव्यावेळी केलेल्या भाषणात राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे (Loudspeakers For Azaan) काढा, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेचं प्रसाद लाड यांनी स्वागत केलं. (BJP Vs Shivsena)

दरम्यान, मनसेने (MNS) घेतलेली हिंदुत्वाची भूमिका चांगली बाब आहे. तशी भूमिका पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) घेऊ शकतात का?, असा सवाल लाड यांनी केला आहे.
त्यासोबतच अजान आणि मशिदीवरील भोंग्यांबाबत बाळासाहेब ठाकरेंनी (BalasahebThackeray)
घेतलेली भूमिका शिवसेनेनी घेतली असल्याचं लाड म्हणाले.

Web Title : BJP Vs Shivsena | 14 shiv sena mps in touch with us claims bjp leader prasad lad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !