भाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन CM ठाकरेंना सूचवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा केला जात असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी भाजपवर टीका करत, भाजपने शवासन करावे, असा टोला लगावला होता. या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातील स्मशाने अखंड धगधगत आहेत. मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे, अशी टीका भातखळकर यांनी (Atul Bhatkhalkar) केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांना पत्रकारांनी शिवसेना नेत्यांवर दबाव टाकून सत्तास्थापनेसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न विचारला.
यावर त्याला यश मिळेल असे वाटत नाही. आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत.
आमचं शरीर वाघाच अन् काळीज उंदराच यात मोडत नाही.
आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत.
आम्हाला सर्व माहिती असून फार तर तुरुंगात टाकाल.
तुरुंगात जाण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

कामगारांना मोठा दिलासा मिळणार ! 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल भरपाई; एक दिवस उशीर झाला तरी द्यावं लागणार 12 % व्याज

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनीही मोदी सरकारवर योग दिनाच्या दिवशी ताशेरे ओढले आहेत.
लोकांची पोट रिकामी आहेत आणि त्यांना योग करायला लावत आहात.
खिसे रिकामे आहेत आणि बँकेत खाते उघडायला सांगतायत.
डोक्यावर छप्पर नाही आणि शौचालये बनवली जातायत… खरच देश बदलतोय, अशी टीका काटजू यांनी मोदी सरकारवर केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : bjp vs shivsena bjp atul bhatkhalkar replied shiv sena sanjay raut over his statement yoga

हे देखील वाचा

Imran Khan । इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार’

MP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले – ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते’