BJP Vs Shivsena | भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय खळबळ ! म्हणाले – ’शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Vs Shivsena | राज्यातील भाजपा नेते सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) निशाणा बनवत आहेत. सरकार पडणार, अशी भविष्यवाणी वारंवार केली जात आहे. आता भाजपाच्या आणखी एका नेत्याने दावा केला आहे की, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापणार (BJP Vs Shivsena) असे दिसत आहे.

राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर (babanrao lonikar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (union minister raosaheb danve) हे सुद्धा उपस्थित होते. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी (deglur biloli vidhan sabha constituency) भाजपचे सुभाष साबणे (BJP Subhas Sabne) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या समर्थनार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे.

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळले असा दावा यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. देगलूर बिलोली मतदार संघातील जनता भाजपाच्या बाजूने आहे. भाजपा उमेदवाराला मोठ्या मतांनी निवडून आणा, असेही दानवे म्हणाले.

 

साबणेंनी सेनेतून केला होता भाजपामध्ये प्रवेश

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
या प्रवेश कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता.
याच मेळाव्यात साबणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली (BJP Vs Shivsena) होती.

Web Title :- BJP Vs Shivsena | power will change soon babanrao lonikar big statement said a 12 mlas of shivsena in contact with us

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tata Group | टाटा समुहाच्या टीसीएसला बंपर ‘नफा’ ! गुंतवणुकदारही मालामाल, 40% रिटर्ननंतर मिळणार 700% ‘लाभांश’

BMC Election | मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादीला देखील देणार ‘टक्कर’

Pune Crime | अबब ! नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमधील ‘खजिन्या’चा पर्दाफाश; हिरे, सोनं-चांदी अन् रोकड…