BJP vs Shivsena | शिवसेनेला धक्का ! पिंपरी-चिंचवड शिवसेना जिल्हाप्रमुखाचा भाजपात प्रवेश

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – BJP vs Shivsena | आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीला लागली आहेत. त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहरात भाजपने शिवसेनेला जोराचा धक्का (BJP vs Shivsena) दिला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे (Gajanan Chinchwade) आणि त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे (Ashwini Chinchwade) त्याचबरोबर कामगार नेते अमोल कलाटे (Amol Kalate) यांनी आज (बुधवारी) भाजप पक्षात प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 (Municipal elections 2022) मध्ये होणार आहे. त्यामुळे अनेक पक्ष आपला जोर लावत आहे. त्यातच चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखसह अन्य कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश झाल्याने शिवसेनेला हे एक धक्कातंत्रच (BJP vs Shivsena) म्हणावं लागेल. मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गजानन चिंचवडे यांनी चापेकर बंधू स्मारकाची प्रतिकृती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगतापसह (Laxman Jagtap) अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचे कट्टर समर्थक असल्याचे मानले जाते. त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या 2 वेळा नगरसेविका (Corporator) म्हणून विजयी झाल्या आहेत. गतवर्षी स्थायी समितीच्या सदस्य पदावर त्यांची वर्णी लागणार होती. परंतु, काही कारणास्तव पक्षाने त्यांना स्थायी समिती सदस्यपद नाकारले. याच नाराजीतून त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी भाजप (BJP) पक्षात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.

Web Titel :- BJP vs Shivsena | Push to Shiv Sena! Pimpri-Chinchwad Shiv Sena district chief joins BJP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये भरपाई मिळणार; केंद्राची SC ला माहिती

Pune News | इमारतीचं बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला मजूर; 2 तासानंतर सुटका

Pune Anti Corruption | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यासह एका संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ