भाजपची वेबसाईट हॅक 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. वेबसाईट सुरु केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह मेसेज दिसत होता. परंतु काही वेळाने ती सुरु केल्यावर एरर मेसेज येत आहे. भाजपकडून यावर अद्यापतरी काही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

भारतीय जनता पक्षाची www.bjp.org ही वेबसाईट मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उगडली तेव्हा त्यावर आक्षेपार्ह भाषेचा वापर केला गेल्याचे दिसले, या वेबसाईटवर जर्मनीच्या वाईस चान्सलर अंजेला मर्केल आणि नरेंद्र मोदी यांचा एक व्हीडीओ दिसतो आहे. या व्हिडीओवर काही आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला दिसला. त्यानंतर काही वेळाने वेबसाईट उघडत नव्हती. तर त्यावर एरर मेसेज दिसत आहे. भाजपाची ही अधिकृत वेबसाईट १९९५ मध्ये सुरु करण्यात आली होती. परंतु १० ऑक्टोबर २०१८ पासून ती अपडेटच केली गेली नाही. भाजपकडून यासंदर्भात अद्य़ाप काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.