निरव मोदीला अटक करणे ही निवडणुकीसाठी खेळी, ‘या’ नेत्याची टीका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्जबुडव्या निरव मोदीला लंडन मध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र काँग्रेसकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. निरव मोदीला भाजपा निवडणुकीसाठी भारतात आणेल आणि निवडणूक संपली की परत परदेशात पाठवेल अशी टीका काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना आझाद म्हणाले, ‘ निरव मोदीला परदेशात पळून जाण्यास भाजपनेच मदत केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीला अटक करणे ही निवडणूकीत फायदा करून घेण्याची खेळी आहे. यामुळे निवडणुका झाल्यावर मोदीला पुन्हा परदेशात पाठवतील, असा आरोप त्यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1108312496195010560

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

बँकांना करोडो रुपयांचा गंडा घालून परदेशात पाळलेल्या निरव मोदी याला लंडन मधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान काही पत्रकारांना निरव मोदी लंडनमध्ये दिसला होता, त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

नीरव मोदीविरुद्ध विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर, आता लंडनमधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने जुलै-ऑगस्टमध्ये नीरव मोदीविरोधात ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली होती.