महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपा आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेत्यांच्या बैठका घेण्यात येत आहे. भाजपाच्या आज (मंगळवार) नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय अमित शाह यांनी घेतला आहे. भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात बैठक पार पडली.

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी ३ राज्यांमध्ये कंबर कसली आहे. यासाठी भाजपाच्या मुख्यालयात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला अमित शाह यांच्यासह भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित होते. या बैठकीत भाजपा उमेदवार आणि त्याचबरोबर अमित शाह यांनी चर्चा केली. त्यावेळी महाराष्ट्रात देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रासह झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like