३० ‘प्रस्थापित’ भाजप आमदारांचे विधानसभेचे तिकीट ‘तळ्यात-मळ्यात’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. आत्मविश्वास दुणावलेल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी हि आनंदाची बातमी असून ते यादृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत ‘अब की बार २२० पार, फिर एक बार शिवशाही सरकार’ अशी घोषणा दिली आहे.

त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन महायुतीच्या पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यास महायुती तयार झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात रथयात्रा काढणार असून लोकभेत मिळविलेल्या यशाचा फायदा घेण्यासाठी हि रथयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी निकषांवर भाजप हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे भाजपच्या ३० ते ३२ विद्यमान आमदारांना याचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत बसणार आहे. यासाठी काही संस्थांकडून सर्वे करून घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक ज्येष्ठ पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्याकडूनही ‘फीडबॅक’ घेतला जात आहे. तो महत्त्वाचा मानला जातो. यामुळे आता विद्यमान आमदारांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत देखील अनेक खासदारांचे तिकीट कापण्यात आले होते. लोकप्रियता आणि जनाधार आणि मतदारसंघात केलेले काम या आधारावर खासदारांचे तिकीट कापण्यात आले होते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात देखील भाजपने अनेक जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये विष्णू सावरा, प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, अंबरिशराजे आत्राम यांसारख्या मंत्र्यांचा समावेश होता. याचबरोबरच अनेक जागांवर अदलाबदलीची देखील चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र महा युतीतील मित्रपक्ष असणारा शिवसेना यावर काय भूमिका घेतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले