‘पुढचं सरकार भाजपच स्थापन करणार’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुढचं सरकार भाजपच स्थापन करणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यापलांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जनतेला योग्य वेळेत सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढचं सरकार भाजपच स्थापन करणार. सत्ता स्थापन करताना कोणताही घोडेबाजार करणार. आम्ही लढवलेल्या 70 टक्के जागा या भाजपला मिळाल्या आहेत. महायुतीच सरकार बनवू असं म्हटलं होतं. आम्ही उद्धव ठाकरेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही सेना अडीच वर्षांवर अडून बसली आहे. परंतु अडीच वर्षांचा शब्द कधीच दिला नाही. त्यांना(शिवसेनेला) आमच्याशी नातं ठेवायचं नाही असे दिसत आहे. पाच वर्ष जनतेनं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” असे फडणवीस म्हणाले.

याशिवाय पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाईट याचं नाही वाटत की, शिवसेनेला आमच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ नव्हता. चर्चा करण्यासाठी वेळ लागू शकतो हे मी समजू शकतो. परंतु वाईट याचं वाटतं की, शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी वेळ होता. शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी रोज चर्चा होत होती. दिवसातून तीन-तीन वेळा चर्चा होत होती. परंतु भाजपशी चर्चा करण्यासाठी मात्र शिवसेनेला वेळ नव्हता. लोकांनी जो कौल दिला आहे तो भाजप-शिवसेनेला मिळून दिला होता. तो एकट्या भाजप किंवा शिवसेनेला नाही.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढचं सरकार भाजपच स्थापन करणार. त्यांना (शिवसेनेला) आमच्याशी नातं ठेवायचं नाही असे दिसत आहे अशा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप सेनेशिवाय सत्ता स्थापन करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

You might also like