‘राज्यात भाजपचं सरकार पुन्हा येणार, ‘हा’ नेता 100 % मंत्री होणार’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सरकार राज्यात पुन्हा येणार आणि आमदार सुरेश धस 100 टक्के कॅबिनेट मंत्री होणार असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. प्रवीण दरेकर यांनी बीड जिल्ह्यातील कुसळंब येथे सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अण्णा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. दरेकरांच्या या दाव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरेकर म्हणाले, विरोधी पक्ष नेता मी असलो तरी शेती मातीच्या प्रश्नाचं मार्गदर्शन आमदार सुरेश धस करतात. जनसंपर्क कार्यकर्ता आपुलकी आणि नेतृत्व घडवणारा नेता म्हणून ओळख निर्माण झाली.

मला विरोधी पक्ष नेता सुरेश धस अण्णांनी केले आहे अशी कबुली प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येणार आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी ही आघाडी नाही तर बिघाडी आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यावेळी आमदार सुरेश धस हे कॅबिनेट मंत्री 100 टक्के होणार असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. आमदार धस यांनी महसूल राज्य मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. मंत्री नसताना पाच माणसं नसतात मात्र मंत्रिपदापेक्षा मोठी कमाई माणसाचं प्रेम आहे ते धस यांना मिळालं आहे.