भाजपला ‘सोडचिठ्ठी’ देणाऱ्या यादीत ‘या’ 9 आमदारांच्या नावांची चर्चा, चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीपूर्वी भाजपच्या दिशेने सत्तेचे वारे वाहत होते, तेव्हा भाजपमध्ये मेगा भरतीसाठी नेत्यांची झुंबड उडाली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर नेत्यांनी आपला मोर्चा महाविकास आघाडीकडे वळवल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे.

इंग्रजी संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची सत्ता राज्यात येईल या आशेवर काँग्रेस-राष्ट्रवादीतुन पक्षांतर करून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी झाले. मात्र राज्यात निकालानंतर घडलेल्या सत्तानाट्यात भाजपाची सत्ता गेली आणि यातील अनेकांचा हिरमोड झाला. भाजपातील काही आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक आहेत. सत्तेबाहेर राहावे लागल्यामुळे पश्चाताप होत असलेले भाजपचे डझनभर आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह पाटील, नमिता मुंदडा, कालिदास कोळंबकर, काशिराम पावरा, रवीशेठ पाटील, नितेश राणे हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले आमदार आहेत असे बोलले जात आहे.

मात्र या आमदारांबाबत महाविकास आघाडीने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर या आमदारांच्या स्वगृही परतण्याच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like