आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपचा नसले, एकनाथ खडसेंचा खुलासा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 2014 च्या निवडणुकीत युती तोडली नसती तर भाजपाचा एकट्याचा मुख्यमंत्री दिलसा नसता. येणारा मुख्यमंत्री भाजपा नसले तर युतीचा असणार आहे असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाने माझ्यावर अन्याय केला
मी कधीच संपणार नाही, मला जनतेची साथ आहे, जनतेचे प्रेम आहे. मागील 45 वर्षे मी पक्षासाठी काम केलं. माझी इच्छा होती मला निवडणुकीची संधी द्यावी पण पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. पण इतकी वर्ष काम करून पक्षाने अन्याय का केला ? याचं उत्तर मिळत नाही तोवर मी पक्षाला हे विचारत राहणार असेही खडेसेंनी सांगितले.

प्रमोद महाजनांच्या आठवणीने भावूक
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची सर्वपक्षीयांशी असलेली बांधीलकी ही सर्वांच्या परियचाची आहे. त्यांचे नेत्यांशी असलेले घरोब्याचं संबंध विसरता येणार नाहीत, असे सांगताना खडसे भावूक झाले. ज्यावेळी मला विधानसभेतून निलंबित करण्यात आले होतं त्यावेळी प्रमोद महाजन म्हणाले होते, नाथाभाऊंचा आवाज सर्वांना आवडतो. विधानसभेनं एकनाथ खडसे यांना निलंबित केलं म्हणजे ” कुंकुवा विना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही ” तसेच नाथाभाऊ विना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नाही.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी