मुंबई महापौरपदाची निवडणूक लढवण्याबाबत भाजपनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाने महापालिकेच्या महापौरपदाच्या निडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपा मुंबई महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही, अशी माहिती भाजपा नेते खासदार मनोज कोटक यांनी दिली आहे.

मनोज कोटक म्हणाले की, ‘मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. आकड्याचा खेळ करण्यात आम्हाला रस नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर विराजमान होईल.’

राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेतलं असून राज्यात सत्तास्थापनेची तयारी केली आहे. काल शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणाच भाजपनं केली आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे.

Visit : Policenama.com