…तर राज्यात भाजप राहणार नाही, काँग्रेसच्या नेत्याचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. तर राज्यात परत एकदा ऑपरेशन लोटस होणार का? यावरून राजकारणात चर्चा सुरू असताना, याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभेत शहांनी केलेल्या विधानावरून जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर असताना, म्हणाले होते, आपण जे काही राज्यात राजकारणात करायचं ते छातीठोक करतो, सेनेला आपण कोणतेही वचन दिले नव्हते, उलट त्यांनी फसवले. भाजप साखर कारखानदारांना कोण धमकावत असेल तर घाबरत नाही, ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांनी जर तशा स्वरूपाचे वागले असते तर शिवसेना राहिली नसती’ असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात परत एकदा ऑपरेशन लोटस होणार का? ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

नाना पटोले यांनी या विधानावरून, म्हणाले की, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात. त्यांचं बोलणं हीच त्यांची फक्त खासियत आहे. जर ऑपरेशन लोटस झाले तर राज्यात भाजपच राहणार नाही’ अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली आहे. तसेच पुढे म्हणाले, फडणवीस यांनी पुढे पत्रिका दाखवली आहे का? ती राज्यात भाजप सरकार येईल कारण ते कदाचित जास्त पत्रिका पाहतात, अशी कडवट टीकाही नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. तसेच अमित शहा यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? असा टोलाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.