भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतील ‘ही’ १८ आहेत संभाव्य नावे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. काल भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, हि यादी जाहीर करण्यात आली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवार यादीतील नावांवर रात्री उशिरापर्यंत खलबतं कुटली आणि उमेदवारांची यादी अंतिम केली. ती यादी आज प्रदर्शित केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी दिल्लीत एक बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला महामंत्री सुनील बन्सल, महेंद्रनाथ पांडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्या आदी भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.  तसेच या बैठकीकडे भाजपच्या सर्व नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचे उमेदवार यादीतील उमेदवार कोण असणार याची संभाव्य यादी सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने पुन्हा एकदा सत्ता संपादित करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. खासदारांच्या पाच वर्षाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना पुन्हा संधी द्यायची का याकडे भाजप जातीने लक्ष घालत आहे. तसेच उमेदवार यादीवर भाजपच्या मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील वरचष्मा राहणार आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींमुळे मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदारांची धुडधुडी वाढली आहे.

हे आहेत भाजपच्या उमेदवार यादीतील संभाव्य चेहरे

नितीन गडकरी – नागपूर, हंसराज अहिर -चंद्रपूर ,राजीव प्रताप रूडी – सारण, रविशंकर प्रसाद – पटना, संबित पात्रा – पुरी ( ओडिसा ), किरण रिजिजू – अरूणाचल पश्चिम, राधा मोहन सिंह – पूर्व चंपारण, रवि मोहन – त्रिपुरा पूर्व, प्रतिमा भौमिक – त्रिपुरा पश्चिम, विजय चक्रवर्ती – गुवाहाटी, प्रधान बरुआ – लखीमपूर, रामेश्वर तेली – डिब्रूगढ, माला राजलक्ष्मी – टिहरी गढवाल, जोएल उराव – सुदंर गढ (ओडिसा), अश्विनी चौबे – बक्सर, संजय जैस्वाल – पश्चिम चंपारण, आक. के. सिंह – आरा, अजय टमटा – अल्मेडा, रमेश पोखरियाल निशंख – हरिद्वार

You might also like