२०१९ मध्ये कमळच फुलणार, सी वोटर्स आणि एबीपी माझाचा सर्वे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – आगामी लोकसभा निवडणुका २०१९ मध्ये पार पडणार असून या निवडणुकांसह राज्यातील विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी, विरोधकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१९च्या निवडणुकांमध्ये कुणाची सरशी होणार याचे विविध अंदाज वर्तविले जात असताना सी वोटर्स आणि एबीपी माझाने केलेल्या सर्वेत केंद्रात आणि राज्यात पुन्हा कमळच फुलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

वडिलांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केला खुन 

या सर्वेत केंद्रात आणि राज्यात भाजपाचीच सत्ता येईल असा कौल मतदारांनी दिला आहे. अनुकूल समीकरणं जुळली तर देशात एनडीएला ३००, यूपीएला ११६ आणि इतर पक्षांना १२७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या सर्वेत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात जर भाजपा आणि शिवसेना युती झाली तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या म्हणजेच ३४ जागा मिळतील. तर यूपीएला १४ जागा मिळतील असाही अंदाज आहे. महाराष्ट्रात सगळे पक्ष स्वबळावर लढले तर भाजपा आणि मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ तर शिवसेनेला ५ जागा मिळतील. पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार समाधानकारक आहे असे वाटणारे ६४ टक्के आहेत. तर ३५ टक्के लोक मोदींच्या कारभारावर समाधानी नाहीत. महाराष्ट्रातील १३. ४ टक्के मतदारांचा कौल शरद पवारांना आहे. तर काँग्रेस नेत्यांची लोकप्रियता २४ टक्के इतकीच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीने मनसेला सोबत घ्यायचे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला ४६.३ टक्के लोकांनी होय तर ४८.१ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम खूप समाधानकारक असल्याचे ३३.१ टक्के लोकांनी म्हटले आहे. काही प्रमाणात समाधानकारक असं मत ३१.४ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. मुळीच समाधानी नाही असं ३५ टक्के लोकांनी म्हटले असून सांगता येत नाही अशांची संख्या ०.५ टक्के आहे. या सर्वेनुसार एनडीएचीच देशात पुन्हा सत्ता येईल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जाहिरात