भाजप लवकरच राज्यात सत्तास्थापन करेल, नारायण राणेंना ‘विश्वास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची सत्तास्थापनेवर अजूनही चर्चा सुरु असताना आता इकडे भाजप लवकरात लवकर सत्तास्थापन करेल असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे म्हणाले की मी फडणवीसांची भेट घेतली आहे, ते म्हणाले की आपण सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करु आणि भाजप लवकरात लवकर सत्तास्थापन करेल.

सत्ता स्थापनेसाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे सांगताना राणे म्हणाले की सत्तास्थापनेसाठी भाजपला सर्वोतोपरी मदत करु, तसेच पक्षाने मला दिलेली जबाबादारी पार पाडेल असे राणे म्हणाले.

राज्यात सत्तास्थापनेवरुन बोलताना राणे म्हणाले की शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसबरोबर जाईल असे वाटत नाही. विलंब होणं योग्य नाही, ज्यांच्यामुळे हा विलंब होतोय ते जनतेच्या होणाऱ्या दुरावस्थेला जबाबदार आहे. परंतू राज्यात लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. त्यासाठी लागणारे 145 आमदारांचे संख्याबळ जमवण्यास आपण पूर्ण प्रयत्न करु असे देखील नारायण राणे म्हणाले.

राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडतं आहेत. ज्या भाजपने राज्यपालांना सांगितले की आपल्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा नाकारला होता. त्यानंतर आता माहिती येताना दिसत आहे की भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. या घटनेनंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती राजवट हंगामी असल्याने भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकते.

एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतू आवश्यक संख्याबळ भाजप कुठून जमा करणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com