भाजपच्या महिला आमदाराला ‘कोरोना’, घरातील 5 जण पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. या जीवघेण्या संसर्गाचाी बाधा अनेक राजकीय नेत्यांना झाली आहे. जिंतूरच्या भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. , त्यांच्या घरातील अन्य 5 जणही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर पुणे इथे उपचार सुरू करण्यात आले आहेत.

बोर्डीकर यांच्या परिवाराची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. मेघना परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार आहेत. मागील आठवड्यामध्ये काही कामानिमित्त त्या मुंबई इथे गेल्या होत्या, त्यानंतर त्या पुण्यातील घरी असताना त्यांची प्रकृती खालवली. कोरोनाची लक्षण दिसल्यामुळे त्यांनी चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची ही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी पाचही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना खागसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोर्डीकर यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करण्याच्या सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.