‘भाजयुमो’च्या शहर अध्यक्षपदी मानकर तर महिला आघाडी अध्यक्षपदी अर्चना पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता युवा मोर्चा च्या अध्यक्षपदी राघवेंद्र उर्फ मानकर यांच्या नियुक्तीसह विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निवड केली आहे. विशेष असे की दीड वर्षावर महापालिका निवडणूक येऊन ठेपली असताना भाजप ने मागील साडेतीन वर्षात अन्य पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने संधी दिली आहे. एवढेच न्हवे तर महापालिकेतही विविध समित्यांच्या अध्यक्ष पदांवरही अन्य पक्षातून अलेल्याना मांडवाखालून काढून ‘ डॅमेज कंट्रोल ‘ चा प्रयत्न करण्यात आला आहे.

बापू मानकर यांच्यासह महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अर्चना पाटील, ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी योगेश पिंगळे, भाजप शहर उपाध्यक्षपदी रमेश आढाव यांना अखेरच्या टप्प्यात पक्ष संघटनेत स्थान देण्यात आले आहे. ही सर्व मंडळी साडेतीन वर्षांपूर्वी अन्य पक्षातून भाजप मध्ये आले आहेत.

महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, उपाध्यक्ष पदी शीतल सावंत, विधी समिती अध्यक्षपदी मनीषा लडकत, उपाध्यक्ष पदी मनीषा कदम, यांची निवड झाली. कोरोना मुळे विषय समित्यांच्या निवडणुका लांबल्या होत्या. आज या निवडणुका झाल्या असल्या तरी सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांना फक्त सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर साधारण आठ महिन्यांपूर्वी माजी आमदार जगदीश मुळीक यांची भाजप शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. परंतु विविध कारणास्तव शहर कार्यकारिणी वरील नियुक्त्या रखडल्या होत्या. तीन ते चार टप्प्यात अखेर कार्यकारिणी जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. विशेषतः अखेरच्या टप्य्यात अन्य पक्षातून आलेल्याना कार्यकारणीत सामावून घेतल्याचे पाहायला मिळत आहे.