काँग्रेसच्या जिंकलेल्या ‘या’ जागा भाजपने पुन्हा जिंकल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात भाजपने ३५३ जागा जिंकताना काँग्रेसचा दारुण पराभव केला. तसेच या निवडणुकीत मागील दोन वर्षात देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने काही जागा गमावल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपने पोट निवडणुकीत गमावलेल्या जागा देखील पुन्हा जिंकत मोदी लाट ओसरल्याच्या विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले.

कोणकोणत्या आहेत या जागा

१)गोरखपूर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गाद समजली जाणारी हि जागा योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत हि जागा समाजवादी पार्टीने जिंकली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत या ठिकणाहून प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी यावेळी विजय मिळवला आहे.

२)भंडारा गोंदिया

याठिकाणी देखील भाजपचे नाना पाटोळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत हि जागा पुन्हा एकदा भाजपने जिंकली आहे.

याचबरोबर फुलपूर आणि केराना या दोन जागा देखील २०१४ साली भाजपने जिंकल्या होत्या मात्र पोटनिवडणुकीत त्या त्यांना गमवाव्या लागल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी त्या जागा जिंकल्या आहेत. फुलपुरमध्ये भाजपच्या केशरी देवी पटेलने तर केराना मध्ये भाजपच्या प्रदीप कुमार यांनी विजय मिळवला आहे.

You might also like